गावाविषयी माहिती
श्रीरामनगर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे 2214 आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे २ व व्यायामशाळा 2 अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच 7 मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी,बंधारे व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, व मका,गहू ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष व ऊस या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
श्रीरामनगर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो घरांना लाभ मिळाला आहे. रोहयो अंतर्गत गावातीत्ल हद्दीतील शिवार रस्ते खडीकरण,मजबुतीकरण,तसेच वयक्तिक फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत .स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रीरामनगर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे त्यामुळे १२ महिने गावाला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होतो
ग्रामपंचायत श्रीरामनगर येथे सध्या प्रशासक असून सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन गावाचा विकास घडवून आणतात त्यामुळे ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
श्रीरामनगर गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.