गॅलरी
आम्ही स्वच्छता आरोग्य पर्यावरण करीता कटिबद्ध आहोत
आमच्या ग्रामपंचायत मध्ये सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक आयोजन करून विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत श्रीरामनगर येथे दिनांक 25 12 2025 रोजी मागासवर्गीय बांधवांना 15 टक्के निधीतून व लोकवर्गणीतून घरासाठी सोलर लाईट संच वाटप करण्यात आले त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही व वीज प्रश्न कायमचा मार्गी लागला सदर कार्यक्रमास श्रीरामनगर चे माजी सरपंच श्री भीमराज काळे सर , श्री रावसाहेब गोळे ,माजी ग्राप सदस्य रवींद्र शिंदे श्री विनायक शिंदे , शरद दरेकर,ग्रामपंचायत अधिकारी आम्रपाली देसाई , ग्रामपंचायत कर्मचारी अतुल शिंदे महेश कापसे कृष्णा शिंदे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचे विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत श्रीरामनगर येथे दिनांक 23 12 2025 रोजी बचत गटा मार्फत गावातील स्त्रिया विविध व्यवसाय करतात व त्यातून एक नवीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण करतात त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला त्यामुळे त्यांना निश्चितच नवीन उमेद मिळेल व आणखी जोमाने ते व्यवसायात काम करतील .सदर कार्यक्रमास श्रीरामनगर च्या ग्रामपंचायत अधिकारी आम्रपाली देसाई , ग्रामपंचायत कर्मचारी अतुल शिंदे महेश कापसे कृष्णा शिंदे उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत श्रीरामनगर येथे दिनांक 18/12/2025 रोजी सर्व घरकुल लाभार्थींचा गृहप्रवेश कार्यक्रम करण्यात आला.या गृहप्रवेशाच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रम केल्या मुळे घरकुल लाभार्थींमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. स्वतःच्या हक्काचे घर मिळाल्याचे समाधान घरकुल लाभार्थी व्यक्त केले. सदर कार्यक्रमास श्रीरामनगर चे माजी सरपंच श्री भीमराज काळे सर , श्री रावसाहेब गोळे ,श्री विनायक शिंदे , ग्रामपंचायत अधिकारी आम्रपाली देसाई , ग्रामपंचायत कर्मचारी अतुल शिंदे महेश कापसे कृष्णा शिंदे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचे विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.
जिल्हा परिषद नाशिक यांचे एक अभिमानास्पद नवचेतना अभियानबाबत ग्रामपंचायत श्रीरामनगर येथे दि-17/12/2025 रोजी ग्रामस्थांना माहिती देऊन आवाहन करण्यात आले. अभियानाचे आवाहन केल्यानंतर श्रीरामनगर येथील ग्रामस्थ श्री प्रेमनाथ श्रावण गायकवाड यांनी सौभाग्याचे केले शपथपत्र 1. पतीच्या निधनानंतर महिलांच्या जीवनावर अन्यायकारक सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक बंधने लादणाऱ्या कोणत्याही प्रथा आम्ही कधीही स्वीकारणार नाही. 2. मंगळसूत्र, कुंकू, जोडवे, दागिने व वस्त्रपरिधान याबाबतचा निर्णय हा संबंधित महिलेचा वैयक्तिक अधिकार असल्याचा आम्ही सन्मानपूर्वक स्वीकार करतो. 3. महिलेला दुय्यम ठरवणाऱ्या किंवा तिच्या सन्मानास बाधा आणणाऱ्या कुप्रथांना आम्ही कोणत्याही स्वरूपात समर्थन देणार नाही. 4. कुटुंब, गाव व समाजपातळीवर अशा कुप्रथांविरोधात जनजागृती करण्यासाठी आम्ही स्वतः उदाहरण ठरू व सक्रिय सहभाग घेऊ. 5. महिला सन्मान, समानता, मानवी हक्क व कायद्याचे पालन ही आमची सामूहिक सामाजिक व नैतिक जबाबदारी असल्याची आम्ही खात्री देतो.हे शपथपत्र आम्ही केवळ कागदावर मर्यादित न ठेवता, आमच्या विचारांत, वर्तनात व कृतीत उतरवण्याचा ठाम निर्धार करीत आहोत—जेणेकरून पुढील पिढ्यांना सन्मान, समता व संवेदनशीलतेचा मूल्यवारसा देता येईल. श्रीरामनगर चे ग्रामस्थ श्री प्रेमनाथ गायकवाड यांनी सदर अभियाना मध्ये सहभाग नोंदवून एक नवीन आदर्श स्त्री शक्ती साठी निर्माण केला त्यामुळे त्याचा सत्कार माझी पोलिस पाटील श्री केशव रघुनाथ पुंड व ग्रामपंचायत अधिकारी आम्रपाली देसाई यांनी केला व अभियान अजून व्यापक करण्यासाठी ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आव्हान केले... कार्यक्रमास आशा सेविका बचत गट प्रतिनिधी ग्रामपंचायत कर्मचारी,गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत 13/12/2025 रोजी ग्रामपंचायत श्रीरामनगर तालुका निफाड येथे नाविन्यपूर्ण उपक्रमातून मुलीच्या जन्माचे स्वागत फळझाड देऊन सत्कार केला व 1 नोव्हेंबर नंतर जन्माला आलेल्या मातांना माहेरचा आहेर म्हणून पौष्टिक आहार आणि फळझाड देण्यात आले.आणि वृक्षरोपणाचा एक आगळा वेगळा संदेश दिला.प्रसंगी श्रीमती आम्रपाली देसाई, ग्राप कर्मचारी अतुल शिंदे ,महेश कापसे,कृष्णा शिंदे आशा सेविका सौ जयश्री शिंदे ,उज्वला पवार उपस्थित होते ..
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत श्रीरामनगर येथे 08/12/2025 रोजी अभियानाच्या अनुषंगाने हनुमान मंदिरा समोर ऑक्सिजन पार्क, फ्लॉवर गार्डन, औषधी वनस्पती गार्डन ची उभारणी करण्यात आली त्यामुळे खुली पडलेली जागा वापरात आली व ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले. सदर उपक्रमासाठी ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती आम्रपाली जगन्नाथ देसाई यांनी विशेष प्रयत्न करून उपक्रम यशस्वी केला ग्रामपंचायत कर्मचारी अतुल शिंदे महेश कापसे कृष्णा शिंदे ग्रामस्थ गणेश काळे यांनी श्रमदान केले .
सध्या राज्याभर सुरु असलेले 'मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान' अंतर्गत मौजे श्रीरामनगर येथे दिनांक 20/11/2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता श्री.संत सावता महाराज मंदिर प्रांगणात सदर अभियान जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमास निफाड पं स. गट विकास अधिकारी.नम्रता जगताप मॅडम यांनी भेट देऊन मार्गदर्शन करताना अभियानाची व्यापकता तसेच बचत गटांमार्फत करावयाचे व्यवसाय,प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरू असलेले घरकुले,करवसुली,व अभियानात करावयाचे नाविन्य पुर्ण उपक्रम यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यावर ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती.देसाई मॅडम यांनी अभियान यशस्वीतेसाठी गावाने मोट बांधली असुन श्रमदान,लोकवर्गणी चे माध्यमातून गावाने एकजूट केली असुन सर्व जण तळमळीने यात भाग घेत असल्याचा विश्वास जगताप मॅडम यांना दिला. याप्रसंगी निफाड पं.स.विस्तार अधिकारी बोरसे साहेब, श्रीरामनगर चे माजी सरपंच भिमराज काळे, माजी सरपंच रावसाहेब गोळे,माजी पोलीस पाटिल केशव पुंड, राजाराम काळे व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी ग्रा.पं. कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमास घरकुल लाभार्थी,बचत गट महिला शेतकरी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत श्रीरामनगर येथे 31/10/2025 रोजी अभियानाच्या अनुषंगाने जनजागृती करणे व नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेणे व त्याचे निरसन करणे करिता गावामध्ये अनेक वस्त्यांवर घरोघरी जाऊन सायंकाळी आठ वाजता गृह भेटी देण्यात आल्या. त्यास जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन परिसरातील समस्या सांगितल्या त्यावर ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती आम्रपाली जगन्नाथ देसाई यांनी समस्यांचे उत्कृष्ट निरसन केले व त्यावर तोडगा काढला जेणेकरून भविष्यात गावाच्या विकासामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.प्रसंगी पालक अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री बोरसे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती आम्रपाली जगन्नाथ देसाई, ग्रामपंचायत कर्मचारी अतुल शिंदे महेश कापसे कृष्णा शिंदे उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत मौजे श्रीरामनगर (कोळवाडी) येथे दि 19/09/2025 रोजी श्रमदानातून स्मशानभूमी स्वच्छता मोहीम कार्यक्रमाचे आयोजन केले असता सदर मोहिमेत श्रीरामनगर नागरिकांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी व जि. प. शाळा मुख्याध्यापक,शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छता मोहीम यशस्वी पार पडली. सदर मोहिमेत श्रीरामनगर ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती.देसाई मॅडम श्रीरामनगर चे पोलीस पाटिल रविंद्र शिंदे माजी सरपंच रावसाहेब गोळे,भिमराज काळे ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा शिंदे,महेश कापसे,अतुल शिंदे तसेच ग्रामस्थ शरद दरेकर,संदीप गुंजाळ,दौलत खताळे, किरण शिंदे , ज्ञानेश्वर गाडेकर, शरद खताळे ,पांडुरंग शिंदे,प्रेमनाथ गायकवाड,राजेंद्र क्षिरसागर,श्रावण गोळे,नवनाथ काळे,भास्कर गोळे, राजु गाडेकर उपस्थित होते
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत श्रीरामनगर येथे 17 9 2025 रोजी शुभारंभ ग्रामसभा घेण्यात आली. त्यास जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व ग्रामसभेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती आम्रपाली जगन्नाथ देसाई यांनी सदर ग्रामसभेचे व रॅलीचे भव्य आयोजन केले होते त्याप्रसंगी ग्रामसभेचे पालक अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री बोरसे साहेब उपस्थित होते त्याचप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी आईटवर तात्या व वैद्यकीय अधिकारी हेदेखील उपस्थित होते. आरोग्य विभागाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यासही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.आरोग्य सेवक अशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका बचत गटाचे सीआरपी बचत गटातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार मिळवण्याचा निर्धार सर्व ग्रामस्थांनी केला आहे .